Breaking News

 

 

प्रतीक्षा संपली : दहावीचा निकाल उद्या !

पुणे (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या (शनिवार)  जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मात्र, आता मंडळाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागाच्या निकाल दुपारी १ वाजता विविध संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राज्यभरातून तब्बल १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ४ हजार ८७४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली आहे.

330 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे