Breaking News

 

 

नांगनूरचा पाणीप्रश्न कायमचा मिटवला : आ. संध्यादेवी कुपेकर

हलकर्णी (प्रतिनिधी) :  हिरण्यकेशीच्या काठावर असलेल्या  नांगनुर गावचा पाणी प्रश्न व माझ्यासाठी एक आमदार म्हणून जिव्हाळ्याचा होता. यासाठी खणदाळ (हिटणी) येथून तब्बल अडीच किलोमीटर पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून पुढील काळात शेतीसाठी पाणी देण्याचे आश्वासन, आ. संध्यादेवी कुपेकरांनी दिले. त्या नांगनूरमध्ये आज (शुक्रवार) बोलत होत्या.    

आ. कुपेकर म्हणाल्या, महाराष्ट्र-कर्नाटक यांच्या सीमा वादाच्या समस्येतून हिरण्यकेशीचे पाणी गावाला मिळत होते. त्यामध्ये संकेश्वर नगरपालिकेचे सांडपाणी आणि हिरा शुगर कारखान्याचे मळी मिश्रीत पाणी थेट नांगनुर जॅकवेल जवळ मिसळत होते. त्यामुळे रोगराई, दुषीत पाण्याला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत होते. यासाठी खणदाळ (हिटणी) येथून तब्बल अडीच किलोमीटर पाईपलाईन टाकून स्वच्छ पाणी गावकऱ्यांना दिले. यासाठी मला माजी खा. धनंजय महाडिकांचे सहकार्य लाभल्याचे कुपेकर म्हणाल्या.  

यावेळी गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, मजूर संघाचे माजी अध्यक्ष  उदय जोशी, सरपंच सुप्रिया कांबळे, सदानंद पाटील, पं.स.अधिकारी कमते,  विद्या लोहार, विनोद मोकाशी, साताप्पा तेरदाळे, सातगोंड चौगुले, भरमा आमगे, अशोक  नाशीपुडे, भाऊसो चौगुले, ग्रा.पं. सदस्य विक्रांत नार्वेकर, ग्रामसेवक संदीप तोरस्कर, ग्रामस्थ उपस्थित होते.

2,847 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा