Breaking News

 

 

शिंदेवाडीला दररोज पाण्याचा टॅंकर मिळावा : के. एल. पाटील

धामोड (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई झळा सोसाव्या लागत आहेत. येथल सरपंच के.एल.पाटील यांनी आ. प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी या गावांना पाण्याची भिषण टंचाईची कल्पना दिली. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला पाण्याचा टॅंकर पाठवण्याची व्यवस्थाही केली.

परंतु शासकीय धोरणानुसार दोन दिवसांनी एकदा येथे पाण्याचा टॅंकर येत आहे. याशिवाय माणसी वीस लिटर पाणी दिले जाते. अपुऱ्या पाण्यामुळे शेतकर्‍यांची जनावरे पाण्याविना दगावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वीस लिटर पाण्यामध्ये याचा वापर करताना ग्रामस्थांची दमछाक होते. यासाठी या गावाला दररोज पाण्याचा टँकर पाठविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. 

यावेळी ग्रा.पं. सदस्य रघुनाथ जाधव, ग्रामविकास अधिकारी दिपक बागडी, प्रवीण कदम, गुंडोपंत नाईक, केशव जाधव, बळवंत केसरकर, समाधान नाईक, दिलीप नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

594 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे