Breaking News

 

 

वाशी येथे ग्रामीण फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ

वाशी (प्रतिनिधी) : वाशी (ता.करवीर) येथे श्रीराम समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी.ए.पाटील, राजवीर पब्लिक स्कूल व वाशी फुटबॉल असोसिएशनच्यावतीने ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज (शुक्रवार) नारायण पाटील यांच्या हस्ते झाला.

स्कूलचे अध्यक्ष बी.ए.पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील खेळाडूंना तालुका, जिल्हा स्तरावर खेळता यावे. या उद्देशाने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्माचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच सदरच्या स्पर्धा सलग चार दिवस चालणार आहेत.

यावेळी वाशीचे माजी उपसरपंच अरुण मोरे, संभाजी पोवार, किरण पाटील, खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव सागर पाटील यांनी मानले.

363 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा