Breaking News

 

 

पत्नीचा पतीच्या पगारावर ३० टक्के हक्क : हायकोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या वेळी न्यायालयाने  कमाईच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित आहे. जर, पतीच्या पगारावर कुणीही अवलंबून नसेल तर, पत्नीला पगाराच्या ३० टक्के हिस्सा मिळाला पाहिजे असे न्यायालयाने म्हटलं आहे.

७ मे २००६ रोजी महिलेचे लग्न एका इन्स्पेक्टरशी झालं होते. त्यानंतर १५  ऑक्टोबर २००६ रोजी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेनं पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. २००८ मध्ये महिलेला सर्व प्रथम पोटगी देण्यात आली होती.

या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानं पगारातील ३० टक्के हिस्सा पत्नीला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला पतीनं न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर सुनावणीदरम्यान ही रक्कम १५  टक्के करण्यात आली. त्यानंतर महिलेनं या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. यावर निर्णय देताना न्यायालयानं पतीच्या ३० टक्के पगारावर पत्नीचा हक्क हसल्याचे म्हटलं आहे.

1,269 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा