Breaking News

 

 

‘पशुपतीनाथ’ मंदिराने जाहीर केली आपली संपत्ती

नेपाळ (वृत्तसंस्था) : नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराने पहिल्यांदाच आपल्या संस्थेत जमा झालेल्या संपत्तीचा खुलासा केला आहे. मंदिर समितीनं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, मंदिराकडे ९.२७६ किलो सोनं, ३१६ किलो चांदी आणि १२० करोड रुपयांची रोख रक्कम जमा झाली आहे.

‘पशुपतिनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्यावतीने स्थापित करण्यात आलेल्या समितीनुसार, भक्तांनी देवाला केलेलं सोन्या – चांदीचं हे दान १९६२ ते २०१८ पर्यंतचं आहे. पहिल्यांदाच आम्ही पशुपतिनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टची संपत्ती सार्वजनिकरित्या जाहीर करत आहोत, असं समितीचे अधिकारी रमेश उप्रेती यांनी यावेळी म्हटले. 

मंदिराच्या वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये असलेल्या १२० करोड रुपये रक्कमेशिवाय मंदिराकडे १८६ हेक्टर जमीनही आहे. हिंदूचं श्रद्धास्थान असलेलं पशुपतिनाथ हे शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर पाचव्या शताब्दीत उभारलं आले आहे.

849 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे