Breaking News

 

 

राजू शेट्टी यांच्याशी वैयक्तिक नव्हे, तात्त्विक वाद : सदाभाऊ खोत

पुणे (प्रतिनिधी) : खा. राजू शेट्टी आणि माझ्यात वैयक्तिक काही वाद नव्हते, तर तात्त्विक वाद होते. माझा आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघही वेगळा असल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. खोत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी बैठक आज (गुरुवार) पुण्यात पार पडली. या बैठकीत दहा ठराव करण्यात आले. यानंतर खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सदाभाऊ म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रयत क्रांती संघटनेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आज झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी महिनाभर राज्यात विविध ठिकाणी जाऊन निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेतील त्यानंतर एक अधिवेशन घेऊन संघटनेचा उमेदवार देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच आम्ही महायुतीसोबत असल्याने जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबतही चर्चा केली जाईल, असेही खोत यावेळी म्हणाले.

1,356 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश