कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन २०२३ मध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तीन दिवस स्थानिक सुट्टया दि. १३ डिसेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये जाहीर केल्या आहेत.

या स्थानिक सुट्ट्यांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सोमवार दि. २६ जून २०२३, ज्येष्ठा गौरी आवाहन गुरुवार दि. २१ सप्टेंबर २०२३ आणि दिवाळी (अतिरिक्त) सोमवार दि. १३ नोव्हेंबर २०२३ अशा तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.