Breaking News

 

 

संघ स्वयंसेवकांकडून चिकाटी शिका : शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

पुणे (प्रतिनिधी) : वैचारिक मतभेदांमुळे नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्क संघावर स्तुतिसुमने उधळली आहेत. लोकांशी संपर्क कसा करायचा आणि तो वाढवायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून शिकायला हवे, त्यांच्यासारखी चिकाटी हवी,’ असा सल्ला पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भोसरी मतदारसंघात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघ स्वयंसेवकांच्या कामाचं कौतुक केलं. त्यासाठी एक किस्साच त्यांनी ऐकवला. ‘आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्यायला हवं. ते पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि त्यातले एखादे घर बंद असले तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. हे त्यांच्याकडून शिकायला हवं.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं. आतापासून भेटत राहिलात तर ऐनवेळी आठवण आली का? असा प्रश्न निवडणुकीच्या वेळी मतदार विचारणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असंही त्यांनी सांगितलं. 

678 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *