Breaking News

 

 

महानगरपालिका पोट निवडणूकीत चुरस वाढली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या २३ जूनरोजी होणाऱ्या दोन प्रभागातील पोट निवडणूकीसाठी आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १० जून पर्यंत माघारीसाठी मुदत असून २४ जूनला मतमोजणी होणार आहे.

सिद्धार्थ नगर (प्र.क्र.२८) आणि पद्माराजे गार्डन (प्र.क्र. ५५) या दोन प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. आज शेवटच्या दिवशी सिद्धार्थ नगर प्रभागातून १) सुशिल सुधारक भांदिगरे २) नेपोलियन अशोक सोनुले ३) खुशबू प्रितम पंडीत ४) जय बाळासो पटकारे यांनी आपले अर्ज दाखल केले.

पद्माराजे गार्डन (प्र.क्र. ५५) मधून १) महेश शंकरराव चौगले, २) सुनिता अजित राऊत ३) शेखर महादेव पोवार ४) राजेंद्र वसंतराव चव्हाण ५) पियुष मोहन चव्हाण (शिवसेना) ६) अजित विश्वास राऊत ७) स्वप्निल भिमराव पाटोळे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सिद्धार्थ नगर प्रभागातून ४ तर पद्माराजे गार्डन प्रभागातून ७ असे एकुण ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या (शुक्रवार) उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

नगरसेवक म्हणून वर्षभरच संधी मिळणार असून देखील या पोटनिवडणूकीत चांगलीच चुरस रंगणार आहे.

1,167 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग