Breaking News

 

 

गडहिंग्लज परिसरात वादळ वाऱ्यांसह पावसाची हजेरी…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज परिसरात आज (गुरुवार) सकाळी चारच्या दरम्यान वादळ वाऱ्यांसह विजेच्या कडकटात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच शेतीसेवा केंद्रांमध्येही शेतकऱ्यांची बी-बियाणे व खते खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

पावसाने उशिरा हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना सद्या सुरुवात झाली आहे. आजरा तालुक्यात पेरणीच्या तर गडहिंग्लज तालुक्यात मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यापुढेही पावसाने अशीच कृपादृष्टी ठेवून नक्षत्राचा पाऊस पडणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. अन्यथा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच वाळपीत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.

              मे महिन्यात वळीव पाऊसाची दरवर्षी सुरवात होते त्यानंतर शेतकरी शेतकरी शेती तयार करून जुनमधल्या मिरग पाऊसाची वाट पाहुन पाऊस पडला की पेरणी करून घेतो पण यावर्षी एकादाही वळीव पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यावर चिंतेचे सावट होते तर काही ठिकाणी पाण्याच्या व जनावांराच्या चाऱ्याच्या टांचाईला सामोरे जावे लागत होते.गेली आठ दिवस ढगाळ वातावरण असताना देखील दररोज पाऊस दांडी मारत होता पण आज पहाटे सकाळी पाऊसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकाऱ्यांच्या तोंडावर समाधान दिसून येत आहे.आजरा तालुक्यात पेरणीची तर गडहिंग्लज तालुक्यात मशागतीची धांधल असून चालु नक्षत्राचा पाऊस पडणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांना नूकसानीला सामोरे जावे लागणार असून वाळपीत पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.

1,764 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash