Breaking News

 

 

धोनी, गांगुलीला मागे टाकत कोहलीचा नवा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संघाला सर्वाधिक वेगवान ५० विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीने एम. एस. धोनी आणि सौरव गांगुलीसारख्या दिग्गज माजी कर्णधारांना मागे टाकले आहे. ५० विजयासाठी धोनी ११०, मोहम्मद अजहरुद्दीन ९० आणि सौरव गांगुलीला ७६ सामने वाट पहावी लागली होती. विराट कोहलीनं ६९ व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमी सामन्यात संघाला ५० विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. विंडिजचे माजी कर्णधार व्हिव्हियन रिचर्डस यांचा विक्रम कोहलीने मोडला. व्हिव्हियन रिचर्डस यांनी ७० सामन्यात संघाला ५० विजय मिळवून दिले होते. विंडीजचे क्लाइव लॉयड आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग सर्वाधिक विजय मिळवण्यात संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ६३ सामन्यात संघाला ५० विजय मिळवून दिले आहेत. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे हॅन्सी क्रोनिए आहेत.

दरम्यान, रोहित शर्माची आक्रमक शतकी खेळी आणि गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला. आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत भारताने विश्वचषक स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे.

996 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग