Breaking News

 

 

कोल्हापुरात रविवारपासून प्रथमेश आंबेकरच्या चित्रांचे प्रदर्शन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘मस्कुलर डिसऑनर’ सारख्या दुर्मिळ आजाराने अखेर त्याच्या आयुष्याचा दोर तुटला. पण जिद्द न हरता त्याने मधल्या काळात चित्रकला अवगत केली आणि त्याने काढलेल्या चित्रांच्या माध्यमातून तो कायम जिवंत राहणार आहे. प्रथमेश आंबेकर असे या चित्रकाराचे नाव आहे. त्याने रेखाटलेल्या  ‘ऊर्जा निसर्गा’ची या चित्रांचे प्रदर्शन कोल्हापुरात आयोजित केला आहे. दि. ९ ते १५ जून या कालावधीत राजर्षि शाहू स्मारक भवन येथे हे प्रदर्शन भरणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन मधुरीमाराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती त्याचे वडील राजेश आंबेकर यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

सांगलीतील नामंवत चित्रकार डी.एम. आंबेकर यांचा नातू प्रथमेश. वयाच्या सातव्या वर्षी त्याला ‘मस्कुलर डिसऑनर’ या दुर्मिळ रोगानं गाठलं. पण आजोबांच्या सहाय्याने त्याने जिद्दीने चित्रकला हस्तगत केली. दहावीच्या परीक्षेतही त्याने ६७ टक्केहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले. केवळ दोन बोटांच्या सहाय्याने त्याने तीनशेहून अधिक निसर्ग चित्र रेखाटली. त्याच्या या चित्रांचे सांगली, गोवा येथे प्रदर्शन भरवले होते. कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवावे, अशी त्याची इच्छा होती. मात्र त्यापूर्वीच त्याला काळाने त्याला हिरावून नेले. त्याच्या ह्यातीनंतर का होईना, त्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठीच हे प्रदर्शन येत असल्याची माहिती राजेश आंबेकर यांनी दिली.  

उद्घाटनावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, उद्योजक संग्राम पाटील, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्रेयस आंबेकर, हेमंत दळवी आदी उपस्थित होते.          

174 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा