Breaking News

 

 

मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ‘आरबीआय’चा बूस्टर डोस : रेपो रेटमध्ये कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढती अन्नधान्य महागाई आणि मंदावलेला विकास यामुळे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दुसरे द्विमासिक पतधोरण आज (गुरुवार) जाहीर करताना रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली. लोकसभा निवडणुकीनंतरची व्याज दर बदलाबाबतची रिझर्व्ह बँकेची ही पहिली बैठक होती.

रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच्या सलग दोन पतधोरणात प्रत्येकी पाव टक्का दरकपात केली होती. यंदाही त्यात कपात होण्याची अर्थतज्ज्ञांना अटकळ होती. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली गेले दोन दिवस सुरू असलेली पतधोरण समितीची बैठक आज संपली. संपल्यानंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला. यानुसार रेपो रेट ६ टक्क्यांवरुन ५. ७५ टक्क्यांवर आले आहे. रेपो रेटमध्ये कपात केल्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असून वाहनकर्ज आणि गृहकर्ज स्वस्त होणार आहे.

309 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे