Breaking News

 

 

प्रकाश मेहता एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्यात दोषी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरविल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले होते. 

ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. यामुळे संबंधित बिल्डरला तब्बल ५०० कोटींची फायदा झाला होता. मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. परंतु, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मेहता यांनी चुकून हा प्रकार घडल्याची सारवासारव केली होती. यावरून विधानसभेत जोरदार हंगामा झाला होता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण चौकशीसाठी लोकायुक्तांकडे पाठवले होते.

लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल. ताहलीयानी यांनी अहवालात म्हटले आहे की, मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नाही. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश मेहता यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, आता मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणारे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

702 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे