Breaking News

 

 

सिंधुदुर्गात पावसाची जोरदार हजेरी…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नसला तरी सिंधुदुर्गात आज (गुरुवार) पहाटे मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाटयाचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण, वेंगुर्ला या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मागच्या तीन-चार दिवसात कोकणात मोठया प्रमाणावर तापमान वाढले होते.

अर्धा तास कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या या सरींमुळे काही भागांमध्ये निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. सावंतवाडी, कणकवलीमध्ये सोसाटयाचा वारा, वीजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला.

543 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash