Breaking News

 

 

जगभरात मानसशास्त्र विषय मागे पडला : डॉ. सुभाष देसाई

जेरुसलेम (वृत्तसंस्था) : जगभर मानसशास्त्र हा विषय मागे पडला आहे. आता त्याची जागा नीरोसायन्स यांनी घेतली आहे. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये मानसशास्त्र ऐवजी मेंदू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे, डॉ. सुभाष देसाई सांगितले. ते जेरुसेलममध्ये एम्पिरिकल आणि थिओरेतिकल रिसर्च आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलत होते.

या परिषदेचे अध्यक्ष प्रो. लिरिक झिमरमन (डायरेक्टर सपोर्ट ऑफिस आणि ग्लोबल इंगेजमेंट इजराइल) हे होते. शिवाजी विद्यापीठातील बॉटनी विभागाचे प्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक आणि नेपाळचे प्राध्यापक या परिषदेला उपस्थित होते. ही एक दिवसीय परिषद जेरुसलेम येथे भरली होती.

मुंबई विद्यापीठाचे परराष्ट्र विद्यार्थी कक्षाचे प्रमुख डॉ. सुनील पाटील, डॉ. मनीषा गुरव आणि पालघरच्या डॉ. सोनोपंत दांडेकर शिक्षण संस्थेचे अॅड. तिवारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद संपन्न झाली. भारत आणि इजराइल या दोन देशांमध्ये ज्ञानाच्या देवाणघेवाणी बद्दल सामंजस्य करार करण्यात आला.

भारतीय प्रतिनिधींनी डेड सी, येशू ख्रिस्त यांचे जन्म ठिकाण, क्रुसावर चढवलेले ठिकाण, ज्यू लोकांची वेलींग वॉल अशा काही धार्मिक ठिकाणाला ही भेटी दिल्या. इजराइल पाण्याच्या पुनर्वापराचे प्रयोग आणि वाळवंटामध्ये फुलवलेल्या द्राक्षबागा, केळीच्या बागा, भेंडी आणि अनेक फळांची शेतीला भेट दिली. महाराष्ट्राच्या कोरडवाहू जमिनीमध्ये नव्या तंत्रज्ञानाने शेतीचे प्रयोग यशस्वी होतील. अनेक विद्यापीठांमध्ये इंग्रजी माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रगत ज्ञान मिळवणे शक्य आहे का, याचा आढावाही घेण्यात आला.

363 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग