Breaking News

 

 

पाकिस्तान लष्कराच्या खर्चात कपात : इम्रान खान

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने स्वेच्छेने आपल्या अर्थसंकल्पात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशासमोर असलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सैन्याने हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. याला पाकिस्तानी सैन्याच्या इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दुजोरा दिला आहे.

आसिफ गफूर म्हणाले, सैन्याच्या अर्थसंकल्पात कपात केली असली तर देशाच्या संरक्षणात कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे स्षट केले. आम्ही सर्व संकटांना सामोरे जात राहणार आहोत. बलुचिस्तान आणि इतर दूर्गम भागातही दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण तयार असल्याचे गफूर यांनी सांगितले.

संरक्षण दलाच्या अर्थसंकल्पात किती कपात करण्यात येईल याची माहिती सैन्याकडून देण्यात येणार नाही. दरम्यान, सैन्याने देशाची आर्थिक परिस्थिती पाहता आपल्या अर्थसंकल्पात कपात करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

351 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे