Breaking News

 

 

शरद पवारांना पहिल्याच रांगेतील पास दिला होता, पण…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या शपथविधी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना पाचव्या रांगेतील पास दिल्याने पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत राष्ट्रपती भवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पवार यांना पहिल्या रांगेतीलच पास देण्यात आला होता, मात्र पवार यांच्या कार्यालयाकडून त्यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यामुळेच त्यांचा गैरसमज झाला असावा, असे राष्ट्रपती भवनाचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

मलिक यांनी म्हटले की, शरद पवारांना व्हीव्हीआयपी सेक्शनमध्ये पहिल्याच रांगेत जागा देण्यात आली होती. त्यांना  ‘V’ सेक्शनमध्ये बसण्याचे निमंत्रण देण्यात आले होते जिथे सर्वात वरिष्ठ नेत्यांसाठी जागा राखीव असते. त्यामुळे पवारांच्या पासवरील ‘V’ हे लेबल पहिल्याच रांगेसाठी देण्यात आले होते. मात्र, पवारांच्या कार्यालयाचा या ‘V’ लेबलवरुन गोंधळ झाला असावा आणि त्याला ते पाचवी रांग समजले असावेत, असे मलिक यांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये या वादाबाबत आलेले वृत्त आणि याबाबत राष्ट्रपती भवनाकडे आलेल्या तक्रारींनंतर मलिक यांनी याबाबत ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.

1,998 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग