Breaking News

 

 

सांगली फाट्यावर शिवशाही बसची मोटारसायकलला धडक : बालिका ठार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिवशाही बसने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील समृद्धी विकास पाटील (वय ११, रा. चांदोली वसाहतीसमोर, शिगाव ता. वाळवा, जि. सांगली) ही बालिका ठार झाली, तर तिचे आईवडील गंभीर जखमी  झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास शिरोली-सांगली फाटा शबनम धाब्यासमोर घडला. या प्रकरणी बसचालक अनिल दुर्गुळे याला शिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विकास पाटील हे पत्नी कल्पना आणि  मुलगी समृद्धीसह  मोटरसायकलवरून  सांगलीहून शिरोली मार्गे शिगावला चालले होते. सकाळी सहाच्या सुमारास शिरोली येथील सांगली फाट्यावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या  शिवशाही बसने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. यात विकास पाटील व कल्पना पाटील बाजूला फेकले गेले तर समृद्धी ही एसटीच्या चाकाखाली सापडली. या सर्वांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. समृद्धीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

768 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे