Breaking News

 

 

नीरा कालवा पाणीवाद : शरद पवारांनी राज्य सरकारला सुनावले

मुंबई (प्रतिनिधी) : दुष्काळाची तीव्रता जसजशी वाढू लागली आहे तसतसा पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लगला आहे. नीरा डावा कालव्याच्या पाण्यावरून आता वाद उफाळला आहे. निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे ६० टक्के नियमबाह्य पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. यावर राजकारण करावे पण कुठे आणि कधी याचे तारतम्य ठेवायला हवे. ज्या वेळी संबंध महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, अशा वेळी अशा प्रश्नाच्या बाबतीत सर्वांनी अत्यंत समंजसपणे बोलण्याची गरज आहे, असा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला होता. यामध्ये नीरा देवघर धरणातून ६० टक्के डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला तसेच ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतच करण्यात आला होता, आता हा कार्यकाळ संपला आहे. विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. पण आता बारामतीला दिले जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिले आहेत. यानंतर बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. यावर पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार म्हणाले की मला काही दुसरी फारशी चिंता यात वाटत नाहीये. या मुद्यावरून तालुक्या-तालुक्यात दुरावा निर्माण होऊ नये, ही काळजी घ्यायला हवी. ही काळजी माझ्याकडून घेतली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा