Breaking News

 

 

आर्किटेक्टस् अॅन्ड इंजिनिअर्सच्यावतीने रंकाळा स्वच्छता मोहीम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अॅन्ड इंजिनिअर्स संस्थेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रंकाळा पदपथ उद्यान येथे आज (बुधवार) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

यावेळी अंबाई टँक परिसरातील बागेत, ओढ्यामध्येही स्वच्छता करण्यात आली. तसेच महापालिकेतर्फे कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाच्या ठिकाणी असोसिएशन अध्यक्ष अजय कोराणे व संचालक अंजली जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

या मोहिमेत आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, उमेश कुंभार, प्रशांत काटे, जयंत बेगमपुरे, प्रमोद पोवार, विजय पाटील, रंकाळा संवर्धन समिती, भालकर ग्रुप, रंकाळा प्रेमी, रंकाळा मॉंर्निंग वॉक ग्रुप आदींनी सहभाग नोंदवला.

204 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे