Breaking News

 

 

अखेर बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला !

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील महापौर बंगल्यात आकारास येणार असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनास मुहूर्त मिळाला आहे. जुलै महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. आचारसंहितेमुळे लांबलेली टेंडर प्रक्रिया आता एमएमआरडीए महिनाभरातच पूर्ण करणार असून जुलै महिन्यात भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता,  मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आणि ‘एमएमआरडीए’च्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या. मुंबईतील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडं आहेत. ही झाडं न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारण्यात येणार आहे.

महापौर बंगल्याची २३०० स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी अपुरी पडणार आहे. त्यामुळे ९००० स्क्वे. फूट जागेत बाळासाहेबांचं अंडरग्राऊंड स्मारक तयार होणार आहे. बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रं, व्यंगचित्रं लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल अशा वास्तू अंडरग्राउंड असतील.      

300 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे