Breaking News

 

 

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजानंतर जवानांवर दगडफेक ; ‘इसिस’चे पोस्टर्सही झळकले

श्रीनगर (वृत्तसंस्था) : देशभरात ईद साजरी होत असतानाच काही समाजकंटकांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर तुफान दगडफेक केली. श्रीनगरमधील जामिया मशिदीत ईदनिमित्त शेकडो लोक जमा झाले होते. नमाज पठणानंतर लोक बाहेर आली. त्यानंतर त्यांनी या भागात ड्यूटीवर तैनात असलेल्या जवानांवर जोरदार दगडफेक करण्यास सुरुवात केली.

यावेळी दहशतवादी झाकिर मूसा व मसूद अझहरचा लोकांनी जयजयकार केला. एवढेच नाही तर ‘काश्मीर बनणार पाकिस्तान’ असे पोस्टर्सही झळकावले. या जमावाला आवर घालण्यासाठी जवानांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले. पण तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते समोरून जवानांच्या दिशेने चालून येवू लागले. त्यानंतर बघता बघता रस्त्यावर दगडफेक करणाऱ्या मुलांची संख्या वाढली. यावेळी हे तरुण इसिसचे पोस्टर्स घेऊन घराबाहेर पडत होते.

समाजकंटक मोठया संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी तोंडाला रुमाल बंघले होते. त्यांच्या हातात मूसा आर्मी लिहिलेले पोस्टर्स पकडले होते. तर काही जणांच्या हातात इसिसचे झेंडे होते. हे तरुण पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊ लागले. त्यानंतर अचानक त्यांनी जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात अनेक जवान जखमीही झाले आहेत.

693 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे