Breaking News

 

 

औद्योगिक संघटनांनी उद्यमनगर परिसरात राबवली स्वच्छता मोहीम

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि कोल्हापूर उद्यम को. ऑप. सोसायटीच्या औद्योगिक संघटनांनी शहरातील शिवाजी उद्यमनगर आणि वाय.पी.पोवारनगर येथे आज (बुधवार) स्वच्छता मोहीम राबविली.  या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन दोन्ही संघटनांनी त्यांच्या उद्योजक सभासदांना आणि कामगारांना केले होते. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 

शिवाजी उद्यमनगरमधील कारखानदारांनी आपआपल्या परिसरातील आणि सार्वजनिक ठिकाणचा कचरा गोळा करून तो पोत्यात भरून महापालिकेच्या डंपरमध्ये भरून दिला.  डंपर आणि घटांगाडीची सोय महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती.  यावेळी ठिकठिकाणचा कचरा, प्लॅस्टिक,खरमाती, प्लॅस्टिक बाटल्यांचा  कचरा मोठया प्रमाणात गोळा करण्यात आला. 

यामध्ये दोन हजार कामगारांनी सहभाग घेतला होता. तसेच महिला कामगारांनीही आपला सहभाग नोंदवला होता. शिवाजी उद्यमनगर परिसर, वाय.पी.पोवारनगर, नविन औद्योगिक वसाहतीतील गाळे, हुतात्मा पार्क परिसराची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी तीन डंपर कचरा काढण्यात आला. 

यावेळी अतुल आरवाडे, संगिता नलवडे, हर्षद दलाल, कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, संजय अंगडी, बाबासो कोंडेकर, अशोकराव जाधव,चंद्रकांत जाधव,प्रसन्न तेरदाळकर,अमर करांडे, अभिषेक सावेकर,विजय बुधले,राहुल बुधले,कुशल सामाणी यांच्यासहीत उद्योजक, कामगार, महिला सहभागी झाले होते.

249 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग