केंद्र सरकारकडून ईदनिमित्त अल्पसंख्याकांना मोठी भेट

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईदनिमित्त आज (बुधवार) मोदी सरकारने अल्पसंख्याक समाजाला मोठी भेट दिली. देशातल्या ५ कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यात २.५ कोटी विद्यार्थिनींचाही समावेश आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजात आनंदाचे वातावरण आहे.

अल्पसंख्याक मंत्रालयाने काही महत्त्वाच्या योजना बनवल्या आहेत. या विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘पढ़ो-बढ़ो’ अभियान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी थ्री ई (एज्यूकेशन, एम्प्लॉयमेंट, एम्पावरमेंट) चं लक्ष्य ठेवलं आहे. पदभार सांभाळताच मोदींनी अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक घेतली.

शिक्षण, रोजगार आणि सशक्तीकरण यामुळे सामाजिक आर्थिक स्थिती बदलली जावू शकते. त्यामध्ये ५० टक्के विद्यार्थिनींचा समावेश केला जाणार आहे. शिक्षण आणि रोजगाराची माहिती देण्यासाठी शंभरहून अधिक मोबाईल वॅनचा वापर केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More