गाय दुधाच्या दरात आठ जूनपासून वाढ

0 2

पुणे (प्रतिनिधी) : गायीच्या दुधाच्या दरात २ रूपयांची वाढ होणार आहे. दुधाचे नवे दर ८ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. सध्या गायीच्या दुधाचा दर ४२ रूपये प्रति लिटर असून तो आता ४४ रूपये प्रति लिटर होणार आहे. खाजगी आणि सहकारी दुध महासंघाच्या बैठकीत आज (बुधवार) हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया संघटनेचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी सांगितले की, आम्ही २५ रूपये प्रति लिटर दराने दुध विकत घेतो. सरकारने यावर प्रति लिटर मिळणारे ३ रूपयाचे अनुदानही एप्रिल महिन्यापासून बंद केले आहे. त्यामुळे आमच्यावर याचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढवण्यावर विचार करावा लागत आहे.

संघटनेचे उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांमुळे सरकारकडून मिळणारे अनुदान बंद झाल्याने दुध उत्पादन शेतकऱ्यांना प्रति लिटर २३ ते २५ रुपयाचा भाव देण्यात येत होता. परंतु संघटनेने प्रति लिटर ३० रूपयांचा दर देण्याची मागणी केली होती. एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे जनावरांना देण्यात येणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत झालेली लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे कमीतकमी पुढील तीन महिन्यांसाठी सरकारने ५ रूपयांचे अनुदान द्यावे असेही म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More