Breaking News

 

 

मुंबई ‘या’मध्येही जगात अव्वल !

मुंबई (प्रतिनिधी)  : मुंबई जगातील सगळ्यात जास्त रहदारी असलेले प्रथम क्रमांकाचे शहर बनले आहे. ही बाब ५६ देशातील ४०३ शहरांच्या ट्रॅफिक आणि वर्दळीवर तयार केलेल्या तयार केलेल्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. मुंबईमध्ये पीक अवर्समध्ये लोकांना आपल्या नियोजित ठिकाणावर पोहचण्यासाठी ६५ टक्के जास्त वेळ लागतो. या यादीत ५८ टक्के सोबत दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. हा अहवाल लोकेशन टेक्नोलॉजी कंपनी टॉमटॉमने तयार केला आहे. हे कंपनी अॅपल आणि उबेरसाठी नकाशे तयार करते.

रिपोर्टनुसार, ट्रॅफिकच्या दबावाच्या बाबतीत कोलम्बियाची राजधानी बोगोटा (६३ टक्के) दुसऱ्या, पेरूची राजधानी लीमा (५८) तिसऱ्या आणि रशियाची राजधानी मॉस्को (५६ टक्के) पाचव्या स्थानावर आहे. कंपनीने हा अहवाल सगळ्यात जास्त ट्रॅफिकच्या दरम्यान लोकांना आपल्या नियोजित जागेवर पोहचण्यासाठी किती वेळ लागतो, त्याच्या आधारावर बनवला आहे.  मुंबईमध्ये अंदाजे दर एका किलोमीटरवर ५०० कार धावतात जे प्रमाण दिल्लीपेक्षाही जास्त आहे.

अहवालानुसार, मुंबईमध्ये प्रवास करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ रात्री २ ते सकाळी ५ पर्यंत आहे, या वेळी सगळ्यात कमी ट्रॅफिक असते. तर सकाळी ८ ते १० च्या दरम्यान आपल्या ठिकाणावर पोहचण्यासाठी लोकांना ८० टक्के जास्त वेळ लागतो. तर संध्याकाळी 5 ते ८ च्या दरम्यान ही वेळ १०२ टक्के वर जाते.

477 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे