Breaking News

 

 

‘बीएसएफ’कडून पाकिस्तानी, बांगलादेशी सैनिकांना ‘ईद’ची मिठाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अटारी-वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजर्सना मिठाईचे बॉक्स देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. बीएसएफने आपल्या कृतीमधून पाकिस्तानला शांती संदेश दिला आहे. बीएसएफने अटारी-वाघा सीमेप्रमाणे बांगलादेश सीमेवरही बांगलादेशच्या सैनिकांना मिठाईचे बॉक्स देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईद मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा सण आहे. जगभरात मुस्लीम बांधव ईद मोठया उत्साहात साजरी करतात. सणाच्या निमित्ताने परस्परांबद्दल मनात असलेली कटुता, राग, द्वेष संपवून शांतता, मैत्रीसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

फक्त ईदच्या वेळीच नाही तर दिवाळी, होळी या सणांनाही भारत-पाकिस्तान सीमेवर परस्परांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही.

384 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग