Breaking News

 

 

ज्येष्ठ अभिनेते, विनोदवीर दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निव्वळ चेहऱ्यावरील हावभावांद्वारे आणि संवादफेकीतून रसिकांना निखळ विनोदाचा आनंद देणारे दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज (बुधवार) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांनी हिंदी आणि गुजराती रंगभूमी गाजवली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

दिन्यार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘बाजीगर’, ‘खिलाडी’, ‘बादशाह’, ‘३६ चाइना टाउन’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी छोट्याच पण लक्षवेधी भूमिका केल्या होत्या.

रंगभूमी आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०१९ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास वरळी येथील प्रेयर हॉलमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांनी अनेकांच्या चेह-यांवर हास्य फुलवले, अनेकांना आनंद दिला, मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे ‘ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिलीब आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे