Breaking News

 

 

विराट सेनेच्या ‘मिशन वर्ल्ड कप’ला आजपासून प्रारंभ !

लंडन (वृत्तसंस्था) : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला ३० मे रोजी सुरुवात झाली. मात्र भारतीय संघासाठी आजपासून (बुधवार) सुरुवात होत आहे. साउथदम्टन येथील मैदानावर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होत आहे. दक्षिण आफ्रिका पहिले दोन्ही सामने हरल्यामुळे भारतच या सामन्यात ‘फेव्हरेट’ असेल, मात्र विश्वचषक स्पर्धेतील भारत-आफ्रिका सामन्यांचा इतिहास पाहता आफ्रिकन संघ भारताला वरचढ ठरला आहे. या सामन्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

भारतीय क्रिकेट संघावर नजर टाकल्यास संपूर्ण ताकदीनीशी भारतीय संघ हा रणभूमीत उतरतोय. भारताची फलंदाजी ही मजबूत असून यावेळी गोलंदाजी विभागही चांगला आहे. तर दक्षिण आफ्रिकेची स्थिती पहिल्या दोन पराभवांनी केविलवाणी झालीय. सुरुवातीलाच यजमान इंग्लंडनं तब्बल १०४ धावांनी आणि बांग्लादेशनं केलेल्या लाजीरवाण्या पराभवामुळे आफ्रिकनं संघ खचलेला असताना त्यांचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन दुखापतींमुळे थेट विश्वचषकातूनच बाहेर फेकला गेलाय. तर गोलंदाज लुंगी एन्गिडी आणि फलंदाज हाशिम अमलादेखील दुखापतग्रस्त आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकामध्ये ४ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील केवळ एकच लढत भारत जिंकू शकलाय. तर दक्षिण आफ्रिकेनं ३ वेळा बाजी मारलीय. त्यामुळे आजचा सामना नक्कीच रंगतदार होईल यात शंका नाही.

294 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे