Breaking News

 

 

सरसंघचालकांकडून केंद्र सरकारला कानपिचक्या !

कानपूर (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला देशभरातील जनतेने पुन्हा कौल दिला असून, संघासह भाजप व रालोआवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्रातील रालाेआ सरकारची जबाबदारी वाढली असून, या सरकारने यापुढे अधिकाधिक लोककल्याणाची कामे करावीत. सत्तेचा दुरुपयोग करू नये, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारला कानपिचक्या दिल्या. कानपूरच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या भागवतांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना केंद्र सरकारलाही जनतेच्या हिताची कामे करताना अहंकार बाळगू नये, असा सल्लाही

ते म्हणाले की, केंद्र सरकारने जमिनीवर राहून मिळालेल्या सत्तेचा देशातील नागरिकांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तथापि, तसे करताना सरकारची पावले डगमगू लागली तर संघ त्यांना वेळोवेळी सकारात्मक दृष्टिकानातून सल्ला व मार्गदर्शन करत राहील. तुम्ही किती चांगले काम केले व किती जणांना मदत केली, याने फारसा फरक नाही; परंतु ते करताना अहंकार नसला पाहिजे. तरच त्या कामाला अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे कोणतेही काम करताना अहंकार ठेवू नका; अन्यथा मिळालेले सर्व काही अहंकारामुळे हिरावले जाऊ शकते. या वेळी त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधत राष्ट्रवाद, सामाजिक समानता, सेवा आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

1,128 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे