सांगोला (तालुका प्रतिनिधी): पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले वादग्रस्त विधान अत्यंत लज्जास्पद, अपमानास्पद आणि भ्याडपणाचे आहे. भुट्टोंच्या वक्तव्यातून पाकिस्तान सरकारची हतबलता आणि मानसिक दिवाळखोरीचे लक्षण दिसत असल्याची जळजळीत टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सांगोल्यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून भुट्टोचा निषेध केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, बिलावल भुट्टो याचा धिक्कार असो अशा घोषणा देत भुट्टोंच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करून तीव्र निषेध नोंदवला.

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत भ्याडपणाने भरलेले आहे. जगाची दिशाभूल करणे आणि पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, पाकिस्तानातील अराजकता, लष्करातील वाढते मतभेद आणि बिघडलेले जागतिक संबंध यावरून लक्ष हटवणे हा त्यांच्या विधानाचा उद्देश आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा मोठा गड बनला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगावर छाप टाकली आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यातून मानसिक दिवाळखोरीचे लक्षण दिसत आहे.

यावेळी भाजपचे शिवाजीराव गायकवाड, दुर्योधन हिप्परकर,विजय इंगोले, प्रवीण जानकर, अनिल वाघमोडे, वसंत सुपेकर, संजय गव्हाणे, शिवाजी ठोकळे, सुरेश बुरांडे, संजय केदार, सोयजित केदार, विश्वास कारंडे, राहुल केदार, ओंकार कुलकर्णी, सचिन केदार, बालाजी केदार, मानस कमलापूरकर, नरेश बाबर,विष्णू हिप्परकर, हनी करपे, लक्ष्मीकांत लिगाडे, भालचंद्र भंडारे, रोहित सावंत, साहेबराव पाटील, समाधान भालके, सर्जेराव करडे, ऋषी यलमार, रामभाऊ करडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.