Breaking News

 

 

सुवर्णपदक विजेत्या श्रीवर्धनला दिला शाहू ग्रुपने मदतीचा हात…

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : सेनापती कापशी (ता. कागल) येथील  संजय काशीद यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सुवर्णपदक विजेता श्रीवर्धन निराधार झाला. या कुटुंबाला शाहू ग्रुपने मदतीचा हात दिला आहे.

श्रीवर्धन काशीद याने नेपाळची राजधानी काठमांडू येथे १० व ११ मे २०१९ रोजी झालेल्या ५ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत १ सुवर्णपदक व १ कास्यपदक मिळवले. मात्र  त्याचे वडील संजय काशीद यांचे दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा दुःखद प्रसंगी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला. श्रीवर्धन याला महिन्याला मानधन आणि खेळाचा सर्व खर्चही देण्याची ग्वाही दिली.

यावेळी घाटगे म्हणाले की, शाहू महाराजांचा वारसदार मतदारसंघ बघत नाही. येथून पुढे कोणतीही अडचण आल्यास काशीद कुटुंबियांच्या शाहू ग्रुप पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.

तसेच बोटे इंग्लिश स्कुलचे प्रकाश बोटे आणि एम.के. चौगले यांनी श्रीवर्धनच्या बारावी पर्यंतच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतली आहे. त्याला शैक्षणिक साहित्य,प्रवास खर्च आदींची जबाबदारी बोटे स्कुलने घेतली आहे.

यावेळी अमरसिंह घोरपडे, कर्नल शिवाजीराव बाबर, उमेश देसाई, दीपक कुरणे, बाबुराव गुरव, तुकाराम गुरव आदी उपस्थित होते

255 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा