Breaking News

 

 

बेलेवाडी मासा लघु पाटबंधारे प्रकल्पाला २५ कोटींचा निधी मंजूर : समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : बेलेवाडी मासा लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम गेली कित्येक वर्षे प्रलंबित होते. युती शासनामुळे आणि  सततच्या पाठपुराव्यामुळे याला २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. तेव्हा या प्रकल्पाच्या श्रेयवादात न अडकता कामाला महत्व द्यावे. या तलावामुळे बेलेवाडी मासातील कोरडवाहू शिवारात हरितक्रांती नांदेल, असे प्रतिपादन पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

यावेळी घाटगे म्हणाले की, सध्या सर्वत्र पाणी टंचाई भासत आहे. शेती तसेच पिण्याचे पाणी सुद्धा मिळेना झाले आहे. यासाठी या तलावाचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून गेली २५ वर्षे रखडलेला हा महत्त्वाकांक्षी तलाव मंजूर झाला आहे. या पाझर तलावात ५२ एमसीएफटी पाणी साठणार होणार आहे. यामध्ये १७५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या तलावाच्या बांधाची लांबी ७५० मी. तर उंची २७ मी. आहे.या तलावात १८ हेक्टर क्षेत्र बुडीत होणार असल्याची माहिती समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

यावेळी अमरसिंह घोरपडे,उपसरपंच मुकुंद बोडके,भूसंपादन अधिकारी सागर पाटील, मंडल अधिकारी शिवाजी केसरकर, बी.वाय.साठे, महादेव घाळी,संजय बरकाळे, भिकाजी किल्लेदार, दत्तात्रय केसरकर, मधु तिप्पे, दिलीप पाटील, मच्छिंद्र मगदूम, सदाशिव हातकर, रामा पाटील आदी उपस्थित होते.

420 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे