Breaking News

 

 

शहरात साजरा करणार ‘भगवा सप्ताह’ : रवीकिरण इंगवले

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार, अखंड जिल्ह्यात शिवसेनेला मिळालेली एकुण ७५ टक्के मते यामुळे संपूर्ण जिल्हाच शिवसेनेच्या रुपाने भगवा झाला आहे. म्हणूनच कोल्हापूर शहरात शिवसेनेचे शहर कार्यालय सुरु करीत आहोत. यानिमित्ताने भगवा सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती, शिवसेना शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

इंगवले म्हणाले की, साखर सम्राटांच्या कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय प्रदुषण संपवून ५ मे १९८६ रोजी भगव्याचे रोपटे लावले होते. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. शिवसेना प्रमुखांचे कोल्हापूर हे शिवसेनेची राजधानी बनवण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कोल्हापूर येथील खरी कॉर्नर परिसरात कोल्हापूर शहर कार्यालय सुरु करीत आहोत. या निमित्ताने सुरु होणाऱ्या भगव्या सप्ताहामध्ये शहरातील झाडांच्या संरक्षणासाठी तीन लाख रुपयांचे लोखंडी जाळ्या बसवणार आहे.

तसेच शहरात शिवसेनेच्या तीस शाखांचे उद्घाटन, शिवसेना प्रमुखांच्या तैलचित्राचे वाटप, भाषणाच्या ऑडिओ आणि व्हिडिओचे चौकाचौकात प्रसारण, महाविद्यालयांच्या आवारात एक दिवसात वाहन चालवण्याचे परवाने देण्याची सुविधा, सदस्य नोंदणी अभियान, गांधी मैदान स्वच्छता मोहीम तसेच मैदानातील टर्फचे उद्घाटन, शहरातील युगपुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, जेष्ठ व जुन्या शिवसैनिकांचा सत्कार हे कार्यक्रम या भगव्या सप्ताहात होणार आहेत. यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

258 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा