मुंबई (प्रतिनिधी) :  बाळासाहेबांची शिवसेनेने मुंबईतील बीकेसी मैदानावर भव्य असा दसरा मेळावा आयोजित केला होता, पण या मेळाव्याला गर्दी जमवणे आणि खर्चावरून हायकोर्टाने शिंदे सरकारला धक्का दिला आहे. १० कोटी खर्चाच्या चौकशी प्रकरणाच्या याचिकेचे आता जनहित याचिकेत रूपांतर करून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश दिले आहे.

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये गर्दी जमवण्यासाठी चांगलीच शर्यत रंगली होती. राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी शिंदे गटाने तब्बल १७०० एसटी बसेसचे बुकिंग केले होते. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरले होते. या प्रकरणी शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका दिला आहे. शिंदे गटातील बीकेसी दसरा मेळाव्याच्या विरोधात दाखल केलेली याचिकेला जनहित याचिकेत रूपांतर करून दुसऱ्या खंडपीठासमोर पाठवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.