Breaking News

 

 

राष्ट्रवादीचे दहा आमदार तर संपूर्ण काँग्रेस माझ्या संपर्कात : प्रकाश आंबेडकर

अकोला (प्रतिनिधी) : राज्यातील राष्ट्रवादीचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांचीही व्यथा आपल्याकडे व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेससोबत आघाडी होणार की नाही याबाबत अद्याप काहीच सांगू शकत नसल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आंबेडकरांनी विधानसभेसाठी यावेळी राजू शेट्टींना चुचकारण्याचा प्रयत्न केला. सध्या प्रमुख कार्यकर्त्यांची शेट्टींशी चर्चा सुरु केली आहे. पुढच्या काळात राजू शेट्टींनी कुणासोबत जावं ते लवकर ठरवावे, असे देखील त्यांनी म्हटले.

879 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे