कोल्हापूर (प्रतिनिधी) : जम्मू येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजीचा पुरुष व महिलांचा संघ जाहीर झाला आणि दोन्ही संघ स्पर्धेसाठी रवाना झाले  आहेत.

या संघामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. मुलांच्या संघात आदित्य अनगळ, धनंजय जाधव, विपुल येडेकर, गिरीश जकाते, प्रथम कुमार शिंदे, प्रणव रावळ, श्रेयस तांबवेकर, अथर्व करणाळे, साहिल गुजर, श्रीधर पवार, ओम जवंजाळ. मुलींच्या संघात ज्योती सुतार, अमृता तराळ, श्लोका शिंदे, अनन्या जोशी, अनुजा धबाले, सानिका कदम, स्नेहल पाटील, तनवी कुराडे, श्रेया शिंदे. संघ व्यवस्थापक- कॅप्टन डॉ. राहुल मगदूम, प्रशिक्षक- प्रफुल धुमाळ.
दि. २० ते २३ डिसेंबर दरम्यान जम्मू विद्यापीठ येथे स्पर्धेसाठी जाणाऱ्या संघास शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या. २ डिसेंबरपासून शिवाजी विद्यापीठमध्ये विशेष प्रशिक्षण घेऊन हा संघ निवडण्यात आला. यावेळी क्रीडा विभागाचे पृथ्वीराज सरनाईक, धीरज पाटील, विजय इंगवले उपस्थित होते.