Breaking News

 

 

विरोधी पक्षनेतेपदानंतर आता विखे-पाटील यांचा आमदारकीचाही राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचा भाजप प्रवेश हा निश्चित झाला आहे. भाजप प्रवेशापूर्वी राधाकृष्ण विखे – पाटील यांची मुंबईत काँग्रेस आमदारांसह खलबतं सुरू आहेत. विखे-पाटील यांनी आज (मंगळवार) दुपारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण, लवकरच राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. त्याचाच एक भाग म्हणून विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचे आमदार भारत भालके, अब्दुल सत्तार आणि माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह विखे पाटील यांनी आज चर्चा केली. विखे – पाटील काही काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधत आहेत. शिवाय, राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासह किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. आज विधीमंडळात जाऊन विखे – पाटील यांनी राजीनामा दिला.  त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने विखे-पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री पद देऊ केल्याची चर्चा आहे.

501 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे