Breaking News

 

 

पतीच्या संघाच्या विजयाने ‘सानिया’ला फुटल्या उकळ्या ! : नेटीझन्सनी सुनावले

हैदराबाद (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर टेनिसस्टार सानिया मिर्झा हीदेखील अनेकदा चर्चेचा विषय ठरली. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. विश्वचषका स्पर्धेत पाकिस्तानशी भारताने सामना खेळू नये असा सूर उमटला होता. पण आता सानियाने पाकिस्तान संघाला विश्वचषकातील पहिल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे नेटीझन्सनी सानिया मिर्झाला ट्रोल केले आहे. तू भारतीय आहेस, हे विसरू नकोस, असेही सुनावले आहे.

सलामीच्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे गेल्यानंतर पाकिस्तानने यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेतील गुणांचे खाते उघडले. याबाबत सानियाने ट्विट करून पाकिस्तानच्या संघाचे अभिनंदन केले. “तुम्ही दमदार पुनरागमन करत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. कोणालाही अंदाज नसताना तुम्ही ज्या पद्धतीचा विजय मिळवलात, त्यासाठी तुमचे अभिनंदन !!! आता क्रिकेट विश्वचषक अधिक रंजक झाला आहे”, असे ट्विट सानियाने केले आहे.

मात्र यावरून काही नेटीझन्स भडकले आहेत. पाकिस्तान संघाला शुभेच्छा देण्याची इतकी घाई का? नवरा पाकिस्तान संघातून खेळतोय म्हणून तुला त्या संघाबद्दल जास्त प्रेम वाटते का, असे सवाल करीत इतर संघही या स्पर्धेमध्ये आहेत. त्यांनाही शुभेच्छा दिल्यास बरे होईल. आपल्या संघाला याच उत्साहाने शुभेच्छा दे, तू प्रथम भारतीय आहेत, हे विसरू नकोस, अशा शब्दात त्यांनी सानियाला सुनावले आहे.

1,527 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे