Breaking News

 

 

बुआंचा भतिजाला झटका ; विधानसभा पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. मायावतींनी समाजवादी पार्टीबरोबर युती तोडण्याचे स्पष्ट संकेत आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिले आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा आणि बसपा परस्परांचे कट्टर विरोधक होते. पण लोकसभा निवडणुकीत भाजपाला धूळ चारण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण मोदी लाटेत सपा-बसपा आघाडीचा दारुण पराभव झाला. ‘लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशच्या निकालाकडे पाहिले तर समाजवादी पार्टीचा मुख्य मतदार असलेल्या यादव समाजाने पक्षाला साथ दिलेली नाही. सपाच्या बलाढय उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला’ असे मायावतींनी सांगितले.

आम्ही सपाबरोबर कायमस्वरुपी युती तोडलेली नाही. भविष्यात सपाचे प्रमुख अखिलेश यादव त्यांच्या राजकारणात यशस्वी झाले आहेत असे वाटले तर आम्ही पुन्हा एकत्र येऊ. पण ते यशस्वी झाले नाहीत तर स्वतंत्र लढण्यातच फायदा आहे. त्यामुळे पोटनिवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे असे मायावतींनी जाहीर केले.

381 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा