मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर !

0 1

पुणे (प्रतिनिधी) : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे भारतात येणारा मान्सून आता श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यालगतच्या परिसरात दाखल झाला आहे. मात्र प्रत्यक्षात साधारण सात दिवस उशिरा म्हणजे ३ जूनला दक्षिण श्रीलंकेत मौसमी पावसाने बरसायला सुरूवात केली आहे. अर्थातच भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरही पाऊस किमान सात दिवस उशिरानेच येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सामान्य स्थितीत श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर २५ ते २८ मे दरम्यान मान्सूनचा पाऊस पडणे अपेक्षीत होता. पण, तसे न झाल्याने यंदा मान्सून उशिरा दाखल होत आहे. हवामान पोषक राहिल्यास पुढील आठवड्यात किंवा त्यानंतरच मौसमी पाऊस केरळ किनाऱ्यावर पडायला सुरूवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

राज्यभरात आता केवळ ७.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ३२ धरणातला पाणीसाठा मृत झाला आहे. राज्यातल्या ४२ टक्के भूभाग दुष्काळग्रस्त आहे. मागील ५ वर्षात अशी तिसऱ्यांदा स्थिती ओढवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More