Breaking News

 

 

निर्माण चौकात गुरुवारी ‘रॉकेट’ उडणार ‘झुईक..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे ‘स्पेस इनोव्हेशन लॅब’चे उद्घाटन गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ९.३० वाजता संभाजीनगर येथील निर्माण चौकात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्यक्षात रॉकेट उडवून या ‘लॅब’चे उद्घाटन होणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली.

चिकोडे यांनी सांगितले की, अवकाश संशोधन, रॉकेटस्, सॅटेलाईट ड्रोन तयार करण्याबरोबरच महाराष्ट्रात विज्ञानाधिष्ठित समाज घडविण्याच्या उद्देशाने ही लॅब स्थापन करण्यात आली आहे. भारतात पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणि तेही कोल्हापुरात अशा पद्धतीची लॅब सुरू होत आहे. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि भारतातील अग्रगण्य संस्था एसडीएनएक्स (SDNX) इनोव्हेशन लॅबमध्ये सहकार्य करार झाला आहे. या माध्यमातून मुलांमधील संशोधन वृत्तीला चालना देऊन जास्तीत जास्त वैज्ञानिक बनवण्याचे काम करणार आहे. तसेच मुलांमध्ये अंतराळ संशोधनाची आवड निर्माण करणे, अंतराळ आणि विज्ञान याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रोबोटिक आर्म, ड्रोन, रॉकेट, सॅटेलाईट असे वेगवेगळे तब्बल १२ प्रोजेक्ट वर्षभर शिकवले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ते स्वतः बनवता येणार आहेत. शिवाय त्यासाठी लागणारे सगळे किट्स पुरवले जाणार आहेत. यासाठी माफक फी आकारली जाणार आहे.

उद्घाटन प्रसंगी एसडीएनएक्स संस्थापक संजय राठी, इस्रोचे माजी प्रकल्प संचालक टी. के. सुंदरमूर्ती, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे माजी संचालक पद्मश्री डॉ. शिवराम भोजे, ‘डीआरडीओ’चे माजी संशोधक वराप्रसाद मुरली, नासा हॅनीवेल स्पेस एज्युकेटरच्या अपूर्वा जाखडी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या वेळी कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अभिजीत परांजपे, योगेश चिकोडे, जितेंद्र बामणे, जयदीप मोरे, सचिन साळोखे, प्रमोद पाटील, विजय पाटील, शंतनू मोहिते, सागर पाटील, सुमित पाटील, कृष्णा आतवाडकर, नितीन कामत उपस्थित होते.

591 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा