Breaking News

 

 

कोल्हापुरात व्ही. शांताराम यांच्या स्मरणार्थ लघुपट महोत्सव…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन आणि भगवान क्रियेशन यांच्यावतीने जेष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या स्मरणार्थ दुसरा राष्ट्रीय लघुपट महोत्सव ७ व ८ जून रोजी येथील शाहू स्मारक भवन येथे होत आहे. या महोत्सवात देशभरातून आलेल्या ८० लघुपटांतून २५ लघुपटांची निवड करुन त्याचे सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती, महादेव साळोखे यांनी आज (सोमवार) दिली.

या लघुपट महोत्सवात निर्माते अभयकुमार यांना कोल्हापूर कला गौरव पुरस्कार तर स्मिता बुगड यांना कोल्हपूर नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मिसेस सौंदर्यवती शैलजा डुणूंग यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. अपेक्षा मुंदरगी-काशीकर यांचे भरतनाट्याचा कार्यक्रम सादर होणार असल्याचे सांगण्यात आले.

या लघुपटासाठी उद्योगपती रावसाहेब वंदुरे, मिलींद शिंदे, सादिक मुल्लाणी, निर्माते अभयकुमार, रुपेश जाधव, अशोक नारकर, विजू माने, मंगेश देसाई, सुशांत शेलार, सुजित चव्हाण, गिरीष मोहिते, देवेंद्र चौगुले, स्वप्निल राजशेखर, अजय कुरणे, संजीवनी पाटील उपस्थित राहणार

यावेळी सतीश बिडकर, मोक्षा साळोखे, सुभाष गुंदेशा, सुरेंद्र झुरळे, रणजीत जाधव, अमर मोरे, कौस्तुभ माईनकर आदी उपस्थित होते.

213 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे