Breaking News

 

 

निधी चौधरी यांना भोवले राष्ट्रपित्याबद्दलचे वादग्रस्त ट्वीट !

मुंबई (प्रतिनिधी) : म. गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट करणं आय.ए. एस. अधिकारी निधी चौधरी यांना भोवलं आहे. त्या वादग्रस्त ट्विटची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावरून त्यांची मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. निधी चौधरी यांना आता पाणी पुरवठा विभागात काम करावे लागणार आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

निधी चौधरी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्या सहाय्यक कलेक्टर होत्या. १७ मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे. जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…३०-१-१९४८ साठी थँक्यू गोडसे.’ असे संतापजनक ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं.

त्यानंतर त्यांचं हे ट्विट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र राजकीय वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादीने आंदोलन केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निधी चौगुले यांच्यावर कारवाईची मागणी केली. नागरिकांमधील वाढता रोष पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौधरी यांची तडकाफडकी बदली केली आहे.

579 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे