Breaking News

 

 

महापालिका लोकशाही दिनात तक्रारींचे ‘७’ अर्ज दाखल…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेसंदर्भातील नागरीकांच्या तक्रारींची वेळीच निर्गत व्हावी. यासाठी पालिकेच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजीत करण्यात येत आहे. महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनामध्ये एकूण ७ अर्ज दाखल झाले आहेत. हे सर्व अर्ज लोकशाही दिनाच्या कार्यकक्षेत घेण्यात आले.

या अर्जापैकी नगररचना विभागाशी संबधीत ५, विद्युत १ आणि पवडी विभागाशी संबधीत १ अर्ज आहे. लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे अशा सूचना अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.  

177 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे