Breaking News

 

 

वंदूरच्या ‘चंद्राबाई’ जटामुक्त : मुरगूडच्या झाडमाया मित्रपरिवाराचा उपक्रम !

मुरगूड (प्रतिनिधी) :  वंदूरच्या वृद्ध सेवा आश्रमात ८० वर्षांच्या चंद्राबाई मगदूम या चाळीस वर्षांपूर्वी अंधश्रद्धेच्या बळी ठरल्या.  डोक्यावरती भलं  मोठे जटांचे ओझे घेऊन ४० वर्षे त्यांनी  हा अंधश्रद्धेचा भार पेलला.  या जटांचे प्रवीण सूर्यवंशी यांच्या झाडमाया मित्र परिवारांने चंद्राबाईना जटामुक्त करून सामाजिक बांधिलकी जोपसली.

(जाहिरात

प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…

आर्या आर्यन प्ले स्कूल CBSE पॅटर्न

प्ले ग्रुप/नर्सरी/जु.केजी/सि. केजी

गारगोटी इंग्लिश स्कूल

५वी ते १०वी

गारगोटी ज्युनिअर कॉलेज

११वी व १२ सायन्स

 (मराठी मध्यम)

तज्ञ व अनुभवी स्टाफ

विद्यार्थ्यांकडे वयक्तिक लक्ष

स्कूल बस ची सुविधा

सुसज्ज संगणक लॅब

निसर्गरम्य परिसर

प्रत्येक टॉपिक नुसार सराव टेस्ट

JEE/NEEET/CET पूर्वतयारी

पत्ता – जोतिबा मंदिरापुढे,आकुर्डे रोड, गारगोटी

9970156874 / 9172505810)गेली काही वर्ष श्रीमती विमलाताई सुतार सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतुन वंदूर येथे वृद्धाश्रम चालवतात. त्यांना प्रवीण सूर्यवंशी हे विविध  माध्यमांतून मदत करीत असतात. या आश्रमात ३  फूट लांबीच्या जटा डोक्यावर घेऊन  चंद्राबाई मगदूम आपला वृद्धापकाळ कंठीत आहेत. त्यांना अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचा निर्धार सूर्यवंशी आणि झाड माया परिवाराने केला होता. यावेळी विमलताई सुतार यांच्या सहकार्याने चंद्राबाई मगदूम व त्यांच्या  कुटूंबियांचे प्रबोधन केले.

यावेळी प्रविण सुर्यवंशी, सचिन सुतार, विकास सावंत, राम पवार यांच्या दीड तासांच्या अथक प्रयत्नाने  चंद्राबाईंना  जटामुक्त करण्यात आले. ३ फूट लांब आणि ११ इंच घेरीची ही जट चंद्राबाईच्या डोक्यापासून वेगळी होताच सर्वानी आनंद व्यक्त केला. तर  अंधश्रद्धा बाळगलेल्या चंद्राबाईंचा चेहरा हास्याने फुलला.

यावेळी प्रा. महादेव सुतार, प्रा संजय सुतार, धनंजय सुतार, बाळासाहेब मगदूम, निलेश वडर, रेणूका मगदूम, विमल वडर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
  

201 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे