Breaking News

 

 

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरचे राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत यश…

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड येथील जान्हवी सावर्डेकरने तामिळनाडू येथे झालेल्या सब ज्युनियर व मास्टर नॅशनल पॉवर लिफ्टींग अजिंक्यपद  झालेल्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत ७२ किलो वजनी गटात देशभरातून १३ स्पर्धक सहभागी झाले होते.

(जाहिरात

प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…

आर्या आर्यन प्ले स्कूल CBSE पॅटर्न

प्ले ग्रुप/नर्सरी/जु.केजी/सि. केजी

गारगोटी इंग्लिश स्कूल

५वी ते १०वी

गारगोटी ज्युनिअर कॉलेज

११वी व १२ सायन्स

 (मराठी मध्यम)

तज्ञ व अनुभवी स्टाफ

विद्यार्थ्यांकडे वयक्तिक लक्ष

स्कूल बस ची सुविधा

सुसज्ज संगणक लॅब

निसर्गरम्य परिसर

प्रत्येक टॉपिक नुसार सराव टेस्ट

JEE/NEEET/CET पूर्वतयारी

पत्ता – जोतिबा मंदिरापुढे,आकुर्डे रोड, गारगोटी

9970156874 / 9172505810)

या स्पर्धेत जान्हवीने स्कॉट, बेंच आणि डेड या प्रकारात कौशल्य दाखवत स्कॉट विभागात १८० किलो, बेंच विभागात ८५ आणि डेड विभागात १४५ किलो असे एकूण ४१० किलो वजन उचलले. त्यामुळे ती द्वितीय स्थानावर आली. तसेच केरळच्या नंदिनी राजने स्कॉट विभागात २१०, बेंच विभागात १००  आणि डेड विभागात १५५ किलो असे एकूण ४६५ किलो वजन उचलून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर ईश्वरी एन.के. या केरळच्या मुलीला तिसरा क्रमांक मिळाला. 

जान्हवीला शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, कोच विजय कांबळे व सौ. पूजा सावर्डेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. जान्हवीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

474 total views, 3 views today

2 thoughts on “मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरचे राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत यश…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे