Breaking News

 

 

…अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू : लिंगनूर ग्रामस्थांचा इशारा

हमिदवाडा (प्रतिनिधी) : लिंगनूर ते देवगड या मार्गावरील लिंगनूर कापशी येथील  रस्त्याचे रूंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर करावे. तसेच या रस्त्याचे काम दर्जेदार होत नाही. त्यामुळे हे काम बंद पाडण्यासाठी जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा लिंगनूर ग्रामस्थांनी कागलच्या तहसिलदारांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लिंगनूर ते देवगड रस्त्याचे काम दर्जेदार होत नसल्याची शंका ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच रस्त्यावरील पोलीस चौकी स्वमालकीच्या जागेवर स्थलांतरीत करावी. त्यामुळे कापशी – निपाणी – मुरगूड हे मार्ग सुरळीत होईल. तसेच या मार्गावर होणारे अपघातही कमी होतील असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी प्रशांत गायकवाड, ॠषीकेश कुंभार, आनंद पोवार, डी. एस. जाधव,  प्रमोद कुराडे उपस्थित होते.

1,584 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा